गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेंतर्गतप्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेंतर्गत जिल्ह्यातील करवीर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यातून योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातून एका गोशाळेसाठी अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव सादर करण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, डॉ. एस. आर. भरते यांनी दिली आहे .

इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समितर यांच्याकडे दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याने इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य असल्याचेही भरते यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.