धार्मिक मुद्द्यांना सत्ताधाऱ्यांकडून प्रोत्साहन; शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. राज्य सरकारने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करावी. तर धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. तसेच कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. अशा घटनांना सत्ताधारी पक्ष प्रोत्साहित करतोय.” तर सत्ताधारी पक्ष दंगलीसारख्या गोष्टीला प्रोत्साहित करतोय असेही शरद पवार म्हणाले आहेत.