
कागल : इथेनॉल हेच आता साखर उद्योगाचे भविष्य आहे. हे जाणून शाहूने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे.त्याचा भूमिपूजन समारंभ आज विधिवत संपन्न झाला आहे. कारखान्याचा हा विस्तारित इथेनॉल प्रकल्प फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यान्वित होईल.असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरनाचे भूमिपूजन कार्यस्थळावर संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची तर राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे याची प्रमुख उपस्थिती होती.विशेष म्हणजे प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाचा मान कारखान्याचे ज्येष्ठ सभासद ,शेतकरी याना देणेत आला. विधिवत पूजा जेष्ठ संचालक सौ व श्री वीरकुमार पाटील व सौ व श्री युवराज पाटील या उभयतांच्या हस्ते संपन्न झाली.व्यासपिठावर राजे विरेंद्रसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,सर्व संचालक,बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री घाटगे पुढे म्हणाले, केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनाॕल निर्मितीस प्रोत्साहन देत आहे.भविष्यात ते जास्त प्रमाणात इंधनात मिसळण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.
भविष्यात इथेनॉलवर चालणारी वाहने येतील. त्यासाठी पहिला इथेनाॕल पंप शाहू कारखाना उभा करेल. त्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीमध्ये साखर कारखान्यांना फायदा होणार आहे, ही दूरदृष्टी ठेवून कारखान्याने या प्रकल्पाचे विस्तारीकरण हाती घेतले आहे. यावेळी कारखानाचे संस्थापक स्व. राजेसाहेब यांचे स्मरण करताना ते म्हणाले, त्यांच्या विचाराप्रमाणेच कारखान्याची वाटचाल सुरू आहे.ते म्हणत असत कारखान्यास घेतलेल्या कोणत्याही प्रकारच्या कर्जाची 65 टक्के परफेड झाल्याशिवाय दुसरा प्रकल्प घेणे योग्य नाही, त्यांच्या या शिकवणी मागचे विस्तारीकरणाची खर्च आवाक्यात आल्यानंतरच हा प्रकल्प हाती घेतला आहे.यापुढे आमचा बायो सीएनजी गॅस निर्मिती सह बायो सीएनजी पंप उभारण्याचा मानस आहे. तसेच आमच्या नवीन ड्रायर सिस्टीममुळे शुन्य प्रदूषण होईल .यापासून रासायनिक पोटॕशला पर्याय ठरणारे पोटॅश तयार करन्यात येईल, भविष्यात शाहू पोटॅश खत बाजारात आणण्याचे नियोजन आहे.जे कमी दराने शेतकऱ्यांना सभासदांना पुरविण्यात येईल.कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकात साखर उद्योगाची सद्यस्थिती, कारखान्यामार्फत हाती घेतलेले नवीन उपक्रम,तसेच कारखाना, आसवनी, व को जनरेशन प्रकल्पाच्या मागील हंगामाचा आढावा घेताना , केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण आयकर माफीचा कारखाना साखर उद्योगास कसा चांगला फायदा झाला याची सविस्तर माहिती दिली व येणाऱ्या गळीत हंगामातील आव्हाने याचे विवेचन करूनकारखान्याच्या उद्दिष्ट प्रतिसाठी इतर ऊस विल्हेवाटीचे प्रमाण कमी करून सहकार्य करणेबाबत विनंती केली.यावेळी कागल ग्राहक सहकारी संस्था व छ. शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार संपन्न झाला.आभार संचालक सचीन मगदूम यांनी मानले.
*चौकट* 1
*नवतंत्राचा “शाहू” मध्ये सर्वप्रथम स्विकार* कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या शिकवणीप्रमाणेसाखर उद्योगातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून नेहमीच कारखान्यामध्ये आम्ही नवतंत्राच्या वापरास अग्रक्रम दिलेला आहे.या विस्तारीकरनमध्ये कोणतीही तडजोड न करता थोडा खर्च ज्यादा आला तरी चालेल पण भविष्यातील 25 वर्षाचा विचार करून नंबर एकच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जेणेकरून वारंवार या कामावर खर्च होऊ नये याची दक्षता व्यवस्थापनाने घेतली आहे.शाहूच्या या प्रयोगाचा इतर कारखानेही अनुकरण करतील. असा विश्वास श्री घाटगे यांनी यावेळी व्यक्त केला.
*चौकट 2*
शाहू उद्योग समूह नंबर- 1 वरच राहील
शाहू ग्रुप अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहकारी संस्थांची वाटचाल ही भविष्याचा वेध घेत चालू आहे. आवश्यक तेथे आधुनिक तंत्रज्ञान व बदल आणून , व पारदर्शकता ठेऊन या संस्था चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो भविष्यातही चालू राहील यासाठी सभासदांच्या सह सर्व घटकांचे सहकार्य लागेल. निश्चितच आपला शाहू ग्रुप नं 1 एकवरच राहील असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला.