
कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्राला विद्युतपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम उद्या रविवारी ( दि. १९ )करण्यात येणार आहे.
यामुळे रविवारी बालिंग आणि नागदेववाडी या उपसा केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए,बी,सी,डी वार्डांसह उपनगरातील पाणीपुरवठा उद्या रविवारी बंद राहणार आहे.शहरातील ए,बी ,वॉर्ड व त्या संलग्नित उपनगरातील साने गुरुजी वसाहत, राजोपाध्ये नगर ,फुलेवाडी रिंगरोड, क्रांतिसिंह नाना पाटील नगर ,कनेरकर नगर ,टेंबे रोड, शिवाजी पेठ, देवकर पानंद, साकोली कॉर्नर, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, ब्रह्मपुरी, पापाची तिकटी, बुधवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी, ट्रेझरी ऑफिस, सोमवार पेठ ,कॉमर्स कॉलेज परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, आझाद चौक, मिरजकर तिकटी, गुजरी, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5,6,7,8 वी गल्ली, बागल चौक, कुंभार गल्ली या भागात पाणीपुरवठा होणार नाही.