देवस्थान समितीच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी केले पदमुक्त

कोल्हापूर : मागील काही दिवसापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. असे असतानाच आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी पदमुक्त केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेण्यात आल्याने शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. काही दिवसापूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा घेऊन मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढला असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सांगितले होते.