गुन्हे दाखल झाले तरी आंदोलन सुरूच राहणार ; इम्तियाज जलील

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.दरम्यान नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरु केले आहे. तर गुरुवारी जलील यांनी कँडल मार्च काढला होता. पण परवानगी नसताना आंदोलन काढल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, माझ्यावर दाखल केलेला गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही. तसेच असे गुन्हे दाखल झाले तरीही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जलील म्हणाले.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, माझ्यावर दाखल केलेला गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही. राजकीय दबावापोटी पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय. शिवाय काल शिवसेना नेत्यांच्या घरासमोर आंदोलन झाले होते, त्यांच्यावर का कारवाई नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. कालच्या कँडल मार्चप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यासह कँडल मार्च काढणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.