तोंडातून दुर्गंधी का निघते?

आरोग्य टिप्स : तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल, तर लोक सहाजिकच तुमच्यापासून दूर पळायला लागतील. जर या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय करून पाहा. आपल्या नक्कीच कामी येतील.

ग्रीन टी सहजा वजन कमी करणारे लोकं पितात. परंतु, तोंडातील दुर्गंधी काढण्यासाठी देखील वापर केला जाऊ शकतो. यासाठी ग्रीन टीने गुळण्या करा. याने नक्की फरक पडेल.

डाळिंब्याचे साल

डाळिंब्याचे साल तोंडातील दुर्गंधी काढण्यासाठी मदतगार आहे. यासाठी डाळिंब्याचे सालीला गरम पाण्यात उकळवत ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे तोंडातील दुर्गंधी निघण्यास मदत होईल.

सोबत ठेवा पुदिना आणि तुळशीचे पान

तोंडातील दुर्गंधीमुळे जर चारचौघात बोलताना लाज वाटत असेल तर, नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचा वापर करा. यासाठी नेहमी सोबत पुदिना आणि तुळशीचे पानं ठेवा. ही पानं खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी निघून जाते. यासह फ्रेश वाटेल.लिंबू पाणी प्याजेवल्यानंतर लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या. यामुळे जेवल्यानंतर उद्भवणारी दुर्गंधी तोंडातून निघून जाईल.

लवंग आणि बडीशेप

तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी आपण लवंग आणि बडीशेपचा वापर देखील करू शकता. याने तोंडातील दुर्गंधी झटकन निघून जाईल.