कोल्हापूर येथे गुरुवारी “घाटगेज द राईज अँड ए रॉयल डायनेस्टी “ग्रंथ प्रकाशन सोहळा……

कोल्हापूर : घाटगे घराण्याचा उदय आणि विकास (1398 ते 2022) यावर आधारित सौ. नंदितादेवी प्राविणसिंह घाटगे लिखित “घाटगेज द राईज ऑ़फ ए रॉयल डायनेस्टी” या पुस्तकाचा प्रक़ाशन सोहळा गुरुवारी (दि. 9) रोजी सायंकाळी 5.30 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे होणार आहे.

हा प्रकाशन सोहळा श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निमंत्रक राजे प्रवीणसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे, या पुस्तकाच्या पहिल्या आवृतीला अध्यात्मिक गुरू प.पू.रविशंकरजी यांनी आशीर्वाद दिले असून हे पुस्तक कागलच्या घाटगे घराण्याच्या इतिहासावर आधारित आहे.सन 1398 ते 2022 या कालखंडातील घाटगे सीनियर घराण्याचा गौरवशाली इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तब्बल 5 वर्षांच्या नंदितादेवी घाटगे याच्या अथक संशोधनातून, प्रयत्नातून हा ग्रंथ आकाराला आला आहे.या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास माजी खासदार निवेदिता माने, नाबार्ड चे यशवंतराव थोरात, मेजर जनरल अजीम सय्यद, मौसमी आवाडे, गोपाळ राजे, पद्मजाराजे पटवर्धन मिरज, सहनिमंत्रक राजे समरजीतसिंह घाटगे, सौ. नवोदिता घाटगे, राजे विरेंद्रसिंह घाटगे व सौ. श्रेयादेवी घाटगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी इतिहासप्रेमींनी,वाचक बंधू भगिनींनी या प्रकाशन सोहळ्‌यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.