‘या’ उपायांनी मिळवा रागावर ताबा….

आरोग्य टिप्स : राग येणं ही एक सहज स्वाभाविक गोष्ट आहे. राग आल्यावर आपल्यातील नेमकेपणा, विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता हरवून बसतो.ऑफिसमध्ये किंवा घरात काही कारणांस्तव भयंकर राग आल्यावर आपल्याला नक्की काय करायचे आहे, हे समजत नाही. अशा परिस्थिती राग लगेच शांत करण्यासाठी खास उपाय समजून घेऊयात.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. भांडणात किंवा रागात जर आपल्याकडून काही चुकीची कृती घडत असल्यास सगळ्यात आधी स्वतःला शांत करावे. थोडा वेळ शांत राहून आपल्याच रागावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा.

अशावेळी आपण रागात जर कोणती चुकीची कृती करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबून जर आपण आता ही कृती केली असती तर त्याचे काय चांगले, वाईट परिणाम झाले असते, याचा विचार करा. हा विचार करून झाल्यानंतर रिअ‍ॅक्ट् व्हा.आपल्या मनांतील रागाचा स्थर कमी करण्यासाठी आपले आवडते गाणे मोठ्या आवाजात गायला सुरुवात करावी. राग शांत करण्यासाठी मोठ्याने नाच, गाणे केल्यास आपल्या मनावरील स्ट्रेस कमी होऊन राग शांत होण्यास मदत होते.

एखाद्या गोष्टीवरून जर आपणांस खूपच राग आला असल्यास सरळ उठून बाहेर फ्रेश हवेत वॉक करण्यासाठी बाहेर पडा. वॉक करण्यासोबतच, जे काम केल्यामुळे आपणांस आनंद मिळतो ते काम करण्यास सुरुवात करावी. ज्या कामातून आनंद मिळतो ते काम केल्यास आपला राग शांत होण्यास मदत होते. अशावेळी आपण ध्यानाला बसणे किंवा योगा करण्याचा पर्यायही निवडू शकता.आपल्या समस्या ओळखायला शिका.

ज्या समस्येवरुन आपणांस राग आला आहे त्या समस्येबद्दल किंवा अडचणींन बद्दल जास्त माहिती नसल्यास आपल्या जवळच्या मित्र – मैत्रिणींशी त्या विषयावर बोलून चर्चा करा. चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.राग शांत करण्यासाठी स्वतःला शरीरावर छोटे – छोटे चिमटे काढण्यास सुरुवात करावी. यामुळे आपला मानसिक ताण दूर होऊन राग शांत होऊ शकतो.

सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. १० आकडे वरुन खाली किंवा उलटे मोजा. जर राग अधिकच आला असे तर १०० पासून उल्टे आकडे मोजण्यास सुरूवात करा. ज्या वेळेस आपण आकडे मोजायला लागता त्यावेळी हृदयाची गती कमी होऊन आपला राग कमी होतो.