
मुंबई : देशातील इंधनदर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. कारण, इंधनदरात घट झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे जवळपास ३ महिन्यांनंतर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ०.९४ डॉलरने खाली आले असून प्रति बॅरल ८४.९८ डॉलरवर आहे. तसेच, WTI ०.३५ डॉलरने घसरुन प्रति बॅरल ७९.१३ डॉलरवर आले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाल्याचे सांगितले जात आहे.