शरद पवारांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार…

मुंबई : आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर देत पलटवर केला आहे.

‘आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. काल माझ्यासोबत दोन मंत्री होते. सगळी मीडिया होती, काही लपून छपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. असे ते म्हणाले आहेत. दुसरा हात दाखवण्याचा विषय, आत्मविश्वास होता, म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले. महाविकासआघाडीचं सरकार कोणासोबत काम करत होतं? कुणासाठी सरकार चालत होतं?हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. 30 जूनलाच आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे. चांगला हात दाखवला आहे.’ आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, जे लपून छपून करतात त्यांची काळजी करा’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.