कोल्हापूर जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर : महाआवास अभियानात २०२०-२१ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे, यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला .आज गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका शानदार कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राज्यात “अमृत महाअवास अभियान 2022-23” राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

“महा आवास अभियान 2020-21 मध्ये राबविण्यात आलेल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना महाआवास अभियान पुरस्कार व विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल गौरवउद्गार काढले.