राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का ; या खासदाराने सोडला पक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, कारण शरद पवारांच्या सगळ्यात जवळच्या सहकाऱ्यानेच त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं माजिद मेमन म्हणाले आहेत.

’16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे.माजिद मेमन हे 2014 ते 2020 या काळात राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार होते. तसंच ते कायदा आणि न्याय समितीचे सदस्यही होते. पेशाने वकील असलेल्या माजिद मेमन यांनी राष्ट्रीय न्यूज चॅनल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू अनेकवेळा मांडली होती.