आजारपणानंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये ; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काहीदिवसांपूर्वी रुग्णलायतून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवस ते विश्रांतीवर होते. प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले नव्हते.दरम्यान, शरद पवार आजारपणानंतर अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

आजारपणानंतर शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात सकाळी ही बैठक होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पवारांनी बोलावलेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे. यावर 28 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, पवारांनी बोलावलेली बैठक महत्त्वाची मानली जात आहे.