बिहार दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाची टीका…

मुंबई : आदित्य ठाकरे हे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुन शिंदे गटाच्या काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

आता या दौऱ्याबाबत आदित्य ठाकरे यांनीच माहिती दिली आहे.’तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.या दौऱ्यात काही राजकीय चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही.थर्ड फ्रंटवर काही विचार करू नका. त्यावर मोठे नेते बोलतील. आम्ही केवळ पर्यावरण विषयावर बोलणार आहोत. माझा काही अजेंडा नाही.आम्ही फोनवर बोलत होतो. फोनवर अनेकवेळा बोलणं झालं होतं. आज प्रत्यक्ष भेटणार आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ..ही लोक महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील, संजय राऊत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर संतापले, शिंदेंनाही सुनावलं यासोबतच ज्यांनी पीडीपीबरोबर युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये.ज्याच्या विरोधात भाषण केली त्यांच्याबोरबर जाऊन बसले, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.