बीकेसी वरील दसरा मेळाव्यात खर्च झालेले 55 कोटी आले कुठून?: नितीन सातपुते

मुंबई – दसरा मेळाव्याला राज्यभरातून १७०० एसटी बसेस या मागविल्या गेल्या होत्या. या बसेस मागविल्यामुळं राज्यातील नागरिकांची गैरसोय झाली. या बसेस बूक करण्यासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला.एकंदरित बीकेसीवरील दसरा मेळाव्यात ५५ कोटी रुपये खर्च झाले. या खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी कार्यक्रमासाठी झाला होता. राज्य सरकार अधिकृत आहे की, अनधिकृत यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या याचिकेचा निकाल लागायचा आहे.बीकेसीमध्ये दसरा मेळाव्याला एवढा मोठा खर्च केलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय केलेली आहे. हे दहा कोटी किंवा ५५ कोटी रुपये आले कुठून असा सवाल याचिकाकर्ते नितीन सातपुते यांनी विचारला आहे.

दहा कोटी रुपये एसटी महामंडळानं कसे घेतले. भारतीय इन्कम टॅक्स अथॉरिटीनं घेतला आहे. याची चौकशी करावी. दहा कोटी कुठून आले. त्यांची वैयक्तिक चौकशी करावी. इन्कम टॅक्सच्या कलम ६८ च्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही नितीन सातपुते यांनी केली.