ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसेना सोडणार…

मराठवाडा : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार?असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला.

तसेच त्यांनी यावेळी मनसेच्या आजच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या टार्गेटवर होते. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे.माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? हे लोक येतात कुठून? मी संताचा विचार सांगतेय.मी भाजपचा द्वेषपूर्ण राजकारण संपवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढत आहे. या देशाची नागरिक म्हणून काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तरे शोधत आहे. मनसेवर निशाणा दरम्यान त्यांनी यावेळी मनसेवर देखील निशाणा साधला आहे.