करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची ‘या’ रूपात पूजा

कोल्हापूर प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज बुधवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची सिध्दीदात्री रूपात पूजा बांधण्यात आली.

करवीर निवासिनी सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची ही  पूजा आहे. अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली.