यशवंत बँकेची पाच वर्षांत दुप्पट प्रगती- एकनाथ पाटील

कोपार्डे प्रतिनिधी : यशवंत बँकेने पाच वर्षात व्यवसाय, कर्ज वितरण, नफ्यात दुप्पट वेगाने प्रगती केली. मोबाईल बँकिंगची चाचणी झाली आहे. दोन महिन्यांत बँक ग्राहक, खातेदार व कर्जदारांना ही सेवा व सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाहीर केले.

बँकेची ४८ वी वार्षिक सभा एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली, उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजी पाटील यांनी अहवाल वाचन केले. कार्यकारी संचालक रवी पाटील इतिवृत्त वाचन केले.यावेळी बोलताना एकनाथ पाटील म्हणाले की, बँकेने अहवाल सालात २३८ कोटींचा व्यवसाय केला आहे. बँकेला एक कोटी चाळीस लाखांचा नफा झाला. ९८ कोटी ७२ लाखाची कर्ज वाटप केली आहेत.

यशवंत बँक कोपार्डेच्या हद्दीत असून कोपार्डे असा फलक लावावा अशी मागणी केशव पाटील, भूषण पाटील, नामदेव पाटील यांनी केली. यामुळे वातावरण तंग झाले होते. बी. बी. पाटील, अमर पाटील, जोत्स्ना पाटील’ यांनी चर्चेत भाग घेतला. हिंदुराव तोड़कर यांनी आभार मानले.