ज्योतिर्लिंग दूध संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी चंद्रकांत चौगुले यांची निवड

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिरसे येथील जोतिर्लिंग दूध व्यावसायिक संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. गेली अनेक वर्षे या संस्थेमध्ये कै. रंगराव कृष्णाजी पाटील यांच्या गटाची सत्ता असून संस्थेच्या स्वीकृत संचालक पदी आण्णांच्या गटाचे चंद्रकांत दौलू चौगले यांची निवड करण्यात आली.


या निवडी दरम्यान संस्थेचे चेअरमन वसंत रंगराव पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासो कुरणे, शि. ना. पाटील, संचालक श्रीपती ना. पाटील, दिनकर चौगले, भगवान भाटले, शामराव मोरबाळे, सेक्रेटरी दिनकर पाटील व तुकाराम पाटील सुरेश पाटील, एकनाथ चौगले सुनील चौगले सागर चौगले कृष्णात चौगले व कर्मचारी वाकोजी पाटील, श्रीकांत कुरणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत शि. ना. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश चौगले यांनी केले.