निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे : समरजितसिंह घाटगेंचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : आपल्या न्याय मागण्यांसाठी गेलेल्या एकशे वीस एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या कारणावरून निलंबित केले आहे. त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी, अशा आशयाचे निवेदन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मागील आठवड्यात एस टी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आपल्या मागणीसाठी शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरावा करून आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या अपेक्षेने समरजितसिंह घाटगे यांना भेटले होते. या पाश्र्वभूमीवर घाटगे यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री याची भेट घेऊन निलंबित कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देणेबाबत विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही घाटगे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, एस टी च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु राज्य सरकारने त्याची पूर्तता केली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलेने तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान यातील दोन कर्मचारी मयत झाले आहेत.कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांची अर्थिक हेळसांड होत असून कुटुंबांची वाताहात होत आहे.

आता राज्यात सत्ता बद्दल होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने एसटीच्या प्रलंबित देण्यापैकी शंभर कोटी इतकी रक्कम तातडीने दिली आहे. उर्वरित रक्कमसुद्धा हे शासन लवकरच देईल. हेच सरकार आपला प्रश्न मार्गी लावेल अशी आशा या कर्मचाऱ्यांना आहे.

घाटगे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात संजय घाटगे, संजय काळेभोर, आप्पासो शेट्टी, पी.आर.पोलीस, श्रीमंत घोरपडे, कृष्णात कोरे, अनिल चव्हाण, संताजी देसाई, ॲड. ए. डी. मदने, युवराज खांडणे, हेमंत कानकेकर व मासूमकर यांचा समावेश होता.