आबिटकर इंग्लिश मेडीअम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ध्वजारोहण

गारगोटी (प्रतिनधी) : गारगोटी येथील युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मेडीअम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज प्रांगणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहत संपन्न झाला. ध्वजारोहण गारगोटीचे माजी सरपंच भाई आनंदराव आबिटकर यांच्या संपन्न झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर व तालुका संघाचे संचालक अकुंश चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमास माजी ग्रा.पं.सदस्य अल्ताफ बागवान, चंद्रकांत चव्हाण, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र चिले, संग्राम सावंत, ग्रापंचायत सदस्य सुशांत सुर्यवंशी, रणधिर शिंदे, सदस्या अनिता गायकवाड, स्मिा चौगले, भरत शेटके, शिवाजी भोई, सुरेश सुर्यवंशी, सुरेश भाट, उदय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विविध स्पर्धामध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. सुत्रसंचालन नंदकुमार निर्मळे, प्रास्ताविक प्राचार्य बाजीराव जठार यांनी केले. तर आभार जितेंद्र भोसले यांनी मानले.