डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्यावतीने अंध शाळेत खाऊ वाटप

कसब बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिरजकर तिकटी येथील अंध शाळेत खाऊ वाटप करण्यात आले.

मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधन संचलित अंध शाळेतील मुलांसमवेत डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्या विदयार्थी व प्राध्यापकांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा आंनद साजरा केला. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला तिरंगा कप केक, तिरंगा चॉकलेट, जिलेबी व तिरंगा सँडविच या पदार्थांचा समावेश असलेले खाऊचे बॉक्स अंध मुलांना वाटण्यात आले.

यावेळी डी. वाय. पाटील स्कुल ऑफ हॉस्पिटलिटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, राहुल दाते, रॉबिन काळे, सूरज यादव यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.