‘या’ तारखेपासून पावसाळी अधिवेशन

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली.

यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत मुंबईत होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे १८ जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते.

तसेच हे अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार असले तरी यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे.तर २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद आणि विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, या बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.