राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरला रौप्य पदक

बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०२२’ मध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताचे पदक खाते उघडले आहे. वेटलिफ्टर संकेत सरगरने शनिवारी पुरुषांच्या 55 ​​किलो वजनी गटात देशासाठी रौप्य पदक जिंकले. मलेशियाच्या मोहम्मद अनिदने सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या 61 किलोग्रॅम गटात कांस्यपदक जिंकले. मलेशियाच्या अजनील मोहम्मदने सुवर्ण आणि पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारूने रौप्यपदक जिंकले.