कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासन व्यापारी तसेच दुकानदारांवर कारवाई करत असूनही कारवाई अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रशासन करत आहे. प्लास्टिकबंदी बाबतची व्यापारी तसेच दुकानदार यांच्यावरील महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उज्वल कोल्हापूर संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे उपआयुक्त रविकांत आडसुळे यांना देण्यात आले. यावेळी गणेश लाड, अजित पाटील, नितेश कुलकर्णी, किरण गायकवाड, अभिजीत कदम, राजाराम नरके, निवास भोसले, लखन काझी आदी उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की, मुळात व्यापारी आणि दुकानदारांवर कारवाई करून प्लास्टिक वापर थांबणार नाही ज्या ठिकाणी प्लास्टिक तयार होते किंवा उत्पादन आयात होते तेथून कारवाई महापालिका प्रशासनाने करावी उगाच झोपलेल्या प्रशासनाने जागे होऊन सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापारी दुकानदारांना लुटण्याचे काम करू नये महापालिका प्रशासनाने शहरातील विविध प्रश्नांची सोडवण्यासाठी लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे. प्लास्टिक बंदी बाबतची कारवाई महापालिका प्रशासनाने थांबवावी अन्यथा उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडली जाईल याची महापालिका प्रशासनाने नोंद घ्यावी. प्लास्टिक बंदी बाबतची व्यापारी तसेच दुकानदार यांच्यावरील महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई थांबवावी.