पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमल महाडिक यांचा वळीवडेत पाहणी दौरा

कोल्हापूर : २०१९ व २०२१ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेता यंदा सतर्कतेच्या दृष्टीने माजी आमदार अमल महाडिक दक्षिण मतदारसंघात ग्रामस्थांच्या बैठका घेत आहेत. वळीवडे ग्रामस्थांसोबत त्यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत महाडिक यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच तरुणांचा एक गट तयार करून प्रशासनाच्या समन्वयाने कोणकोणत्या उपाययोजना अवलंबायच्या याबाबतच्या सूचनाही संबंधितांना दिल्या.

यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले, “राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजनांची तरतूद केलेली आहेच पण त्याव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत कशाचीही गरज पडल्यास मी तुमच्यासोबत निश्चितपणे उभा राहीन.”

यावेळी वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, वळीवडेचे ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले,विक्रम मोहीते, गोपालदास दर्डा, विजय खांडेकर, प्रशांत जाधव,  योगेश खांडेकर तसेच बाबासाहेब पाटील, वैजनाथ गुरव, उदय पोवार, उदय पाटील, शशी खांडेकर, धनाजी शिंदे, अरुण शिंदे, सनी मोरे, शंकर शिपेकर, राजेंद्र मोरे, बाळासो पाटील, जितेंद्र कुसाळे, रावसाहेब दिगंबरे, प्रदीप खांडेकर, विशाल जगदाळे, राजेंद्र रेपे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.