विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्रीपदी जोशी, जिल्हाध्यक्षपदी कुंदन पाटील

कोल्हापूर : विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा मंत्रीपदी अँड. सुधीर जोशी- वंदुरकर यांची आणि जिल्हाध्यक्षपदी कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद या संघटनेची बैठक राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी येथे झाली. यावेळी प्रांत मंत्री संजय मुद्राळे आणि प्रांत सहमंत्री सतीश गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये अँड. सुधीर जोशी वंदुरकर यांची जिल्हा मंत्री पदी आणि कुंदन पाटील यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 मोहन शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष, शांती भाई लिंबानि यांची जिल्हा सहमंत्री,  अनिल कोडोलीकर यांची बजरंग दल जिल्हा सहसंयोजक, पराग फडणीस यांची बजरंग दल शहर संयोजक, अमर पाटील यांची शहर मंत्री, राजू गडकरी यांची बजरंग दल शहर सहसंयोजक, सुजित खोत यांची विश्व हिंदू परिषद शहर सहमंत्री, राजू मकोटे यांची प्रचार आणि प्रसिद्धी मंत्री, प्रसाद भेंडे यांची मठ मंदिर संपर्क प्रमुख या पदी नियुक्ती करण्यात आली.

त्याचबरोबर दुर्गा वाहिनी संयोजिकापदी सौ. श्वेता कुलकर्णी, शहर संयोजिकापदी अँड. सुप्रिया दळवी आणि शहर दुर्गा वाहिनी सहसंयोजीकापदी कु. आरती पाथरवट यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रांतमंत्र्यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.