‘कोजिमाशि’तील परिवर्तनाच्या लाटेत सत्तारुढ पालापाचोळ्यासारखे उडून जातील : बी. डी. पाटील

 नृसिंहवाडी (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला सभासद कंटाळले असून आमच्या  विरोधी ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ चे बिनिचे शिलेदार त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर आहेत. हे कमी की काय म्हणून सर्वसामान्य सभासदही त्यांच्या गैरकारभाराचे पाढे जाहीरपणे वाचत आहेत. त्यामुळे आता परिवर्तनाची, सत्तांतराची भली मोठी लाट आली असून या लाटेत सत्ताधारी पालापाचोळ्यासारखे उडून जातील, असा घणाघात माध्यमिक शिक्षक संघाचे नेते बी. डी. पाटील यांनी केला.

     नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या निवडणुकीच्या राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. जयंत आसगावकर होते.

   पाटील पुढे म्हणाले, ‘आमच्या राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना गावोगावी शाळा- शाळांमधून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. सत्तांतराची प्रक्रिया आता सुरू झाली असल्यामुळे एकाधिकारशाही आणि केवळ स्वार्थाने बरबटलेल्या सत्ताधाऱी नेतृत्वाची पायाखालची वाळू घसरू लागली आहे. यापुढे ते सभासदांना भावनिक आवाहन करतील; परंतु त्यांची गेल्या कित्येक वर्षांची ही केवळ स्वार्थासाठीची  सवय सर्वांनी ओळखली असून सभासदांनीच आता त्यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.

    यावेळी आमदार जयंत आसगावकरांनीही सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर टीकेची जोड उठवली.

प्रारंभी उमेदवार अमोल सदलगे यांनी स्वागत व रोहिणी निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी धनंजय धोत्रे, संजय पाटील, समीर घोरपडे, एच. आर.पाटील, मिलिंद पांगिरेकर, सुनिता जोंग, संजय चिगरे, सोपान कदम, संभाजीराव खोचरे,विलास साठे, इरफान अन्सारी, शेखर शहा यांची भाषणे झाली.

    उदय पाटील. के. के.पाटील, शंकर पोवार, प्रदीप पाटील, सचिन खोत, सचिन पुजारी, राजेंद्र सूर्यवंशी, एम. के. पोवार, बाजीराव जोंग, बी. एस. खामकर, अशोक पलंगे, सोपान कदम, मंगेश मरळे, संजय चिगरे, चंद्रकांत लाड, अशोक पाटील, हेमंत बावडेकर, बाळासाहेब ढोणे, धनाजी धोत्रे, मुरलीधर गवळी, सुनिता जोंग,सुवर्णा यादव,  सुभाष कोळेकर, सुरेश कारदगे, प्रशांत पोवार, आर. एम. पाटील, विजय जाधव, सुभाष पाटील, दीपक हाके, दिलीप चौगुले, वजीर मकानदार  आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व्ही. एस. पाटील यांनी केले. अनिल बोरगावे यांनी आभार मानले