राजर्षि शाहू आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील : प्राचार्य बी. एस. माने


गारगोटी ( प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचा भुदरगड तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यात प्राचार्य माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कोजिमाशि’चे संचालक एस. एम.पाटील होते.

यावेळी बोलताना एस. एम. पाटील यांनी आमदार जयंत आसगांवकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी लोकशाही विकास आघाडी रिंगणात उतरली असून या आघाडीस कोल्हापूर जिल्ह्यातून उत्स्कुर्त प्रतिसाद मिळत आहे. भुदरगड तालुक्यातून सर्वात जास्त मत्ताधिक्य मिळणार असल्याचे सांगितले.
ग्रंथपाल मारुती भराडे यांनी श्री मौनी विद्यापीठातील ८० टक्के मतदान राजर्षी शाहू आघाडीस मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर म्हणाले सभासदभिमुख कारभाराला सोयीस्करपणे विसरून सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभाराचा कळसच केला आहे याला सभासद निश्चितच जागा दाखवतील. तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पाढा वाचून यावेळी परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले.
यावेळी के. ए. देसाई, सदाशिव करडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

स्वागत संतोष भोसले यांनी प्रास्ताविक के. ए. देसाई यांनी केले. यावेळी बी. ए. सदलगे, के. टी. कांबळे, व्ही. जे.कदम, एस.एम.खेगडे, के. एस. गोजारे, सी.बी.माने, डॉ.एस.बी. शिंदे, प्रा.डी.एस. देसाई, पी.डी. पाटील, प्रा.विलास देसाई, सुनील राजगिरे, हेमंत देसाई, प्रकाश भांदीगरे, सचिन डेळेकर, आर.डी. देसाई, अजित तोरस्कर, यु. एस. मुळीक, एस.एस. कासार, अशोक वारके, युवराज नाईक, डी.वाय. पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय आदित्य यांनी केले आभार सौ आक्काताई नलवडे यांनी मानले.