आमदार प्रकाश आबिटकर नॉट रिचेबल

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेचे ११ नाराज आमदार नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरातमध्ये आहेत. हे सर्व आमदार कालपासून नॉट रिचेबल असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांचाही समावेश आहे.

आमदार प्रकाश आबिटकर हे राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते तिसऱ्या वेळी शिवसेनेतून आमदार झाले असून शिवसेनेचे जिल्ह्यातील ते एकमेव आमदार आहेत. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांना डावलले गेले होते. २००९, २०१४ व २०१९ ला त्यांनी विधानसभेला दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले आणि अपेक्ष म्हणून निवडून आलेल्या राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे निष्ठावंत आबीटकर गटात नाराजी होती.