मध्य प्रदेशमध्ये पंडित नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

भोपाळ : मध्य प्रदेशातील सतना शहरातील चौकात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये काही समाजकंटक नेहरू यांच्या पुतळ्यावर काठीने हल्ला आणि दगडफेक करत आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कमलनाथ यांनी लिहिले, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना शहरातील धवरी चौकातील आहे आहे. ज्यात काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.