मुंबई : वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच एका आठवड्यात महाराष्ट्रात दोन वेळा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. आज सीएनजी ५ रुपयांनी, तर पीएनजी ४.५० रुपयांनी महागला. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी ७२ रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पाईप गॅस ४५ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर झाला आहे.
महानगर गॅसने आज सुधारित दर जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति किलो आणि पीएनजीच्या दरात ४ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर वाढ केली आहे. गेल्या आठवड्यातही महानगर गॅसने दरवाढ केली होती. ६ एप्रिलला सीएनजी ७ रुपयांनी, तर पीएनजी ५ रुपयांनी महागला होता. म्हणजे आठवडाभरात सीएनजी १२ रुपयांनी आणि पीएनजी ९.५० रुपयांनी महागला आहे.