सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी राजेशकुमार राठोड; विजय हावळ उपाध्यक्ष

कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक काल रविवारी मोठ्या चुरशीने झाली होती. यामध्ये ९० टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये अध्यक्षपदी राजेशकुमार तेजपाल राठोड (४०५) हे विजयी झाले. त्यांनी माणिक रामचंद्र जैन (२०३) यांचा २०२ मतांनी पराभव केला. तसेच उपाध्यक्षपदी विजय प्रभाकर हावळ (२६३) हे विजयी झाले. त्यांनी सुहास शशिकांत जाधव (१७३), अनिल राजाराम पोतदार (१७१) यांचा पराभव केला. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आतिषबाजी केली.

 सोमवारी (दि. ११) सकाळी ९ पासून सराफ संघामध्येच मतमोजणीस सुरवात झाली. प्रथम संचालक मंडळ, त्यानंतर उपाध्यक्ष व शेवटी अध्यक्षपदाची मतमोजणी झाली. संचालकपदी विजयी उमेदवार कंसामध्ये मिळालेली मते पुढील प्रमाणे १) किरण गेनमल गांधी (४७९), २) ललित अमृतलाल ओसवाल (४६३), ३) प्रीतम नरेंद्र ओसवाल (४४६), ४) कुमार राजमल ओसवाल (४२९) ५) अशोककुमार केसरीमल ओसवाल (४२३), ६) विजयकुमार आबासो भोसले (४२१), ७) संजय श्रीपाद रांगोळे (४१०), ८) तेजस महादेव धडाम (३८८), ९) भैरू कांतीलाल ओसवाल (३७६), १०) सिद्धार्थ संतोष परमार (३६९), ११) शितल सुभाष पोतदार (३५४), १२)शिवाजी वसंतराव पाटील (३४०).

 मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांच्यासह निवडणूक समितीचे विजय वशीकर, जवाहर गांधी, बिपीन परमार, सुरेश गायकवाड, नंदकुमार ओसवाल, कांतिलाल ओसवाल, उमेश जामसांडेकर व हेमंत पावरसकर या सदस्यांचे सहकार्य लाभले.

🤙 9921334545