कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार असून 10:20 वाजता विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करणार आहेत. अकरा वाजता महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे त्यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी 12:00 वाजता शिवाजी विद्यापीठातील शाहू हॉल येथे आयोजित प्रेसिडेंट व चांसलर अवॉर्ड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12:45 वाजता शिवाजी विद्यापीठातून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. व दुपारी 1:00 वाजता कोल्हापूर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करनर आहेत.