कामावर हजर व्हा नाहीतर उद्यापासून कारवाई : अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे उद्या कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराशी बोलताना दिला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सविस्तर निवेदन दिलं. संपकरी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचं आवाहनही केले. आता मुदत संपली असून, १ एप्रिलपासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असून, जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्या जागी कंत्राटीपद्धतीने नवीन कर्मचाऱ्यांना घेण्यात येईल असे अजित पवार म्हणाले आहेत. आजपर्यंत ३३ हजार १३५ कमर्चारी कामावर हजर झालेत, अजून ४८ हजार ५३० कमर्चारी कामावर हजर राहिलेले नाही.