कोल्हापूर : आकाशाला उत्तुंग गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून अडथळ्यांवर मात करत राजारामपुरी एक्स्टेन्शन प्रभागातील कु. प्रशंसा जगताप ‘हिने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे कमर्शिअल पायलटचे लायसन्स मिळवले आहे.
या यशाबद्दल तिचा माजी खासदार, भाजपाचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जयंत पाटील, कोरगावकर सोसायटी चेअरमन बाबा जगताप, व्हा चेअरमन सूर्यकांत पाटील, मानसिंग चव्हाण, दिनेश सोलंकी, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, दिपक जाधव, करण जाधव उपस्थित होते.