कोल्हापूर : जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल व साथी संस्था यांच्या संयुक्त विदयमाने कळंबा जिल्हा कारागृहामध्ये एचआईव्ही व टीबी या विषयांवर मार्गदर्शन व चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, तसेच याविषयीची प्रश्नमंजुषा ही घेण्यात आली.
चित्रकलेमध्ये एकूण ५० बंदिजनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यापैकी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या बंदिजनांना लेखन सामुग्री, पुस्तके बक्षिस स्वरुपात देण्यात आली. सहभागी बंदिजनांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन दीपा शिपूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे वेळी सीपीआर हॉस्पिटलचे मकरंद चौधरी, अभिजित रोटे, समुपदेशक, सतिश पिसाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीया पाटील, सुरक्षा क्लिनिक समुपदेशक व साथी संस्थेचे अमित चौगुले उपस्थित होते. मुख्य तुरुंगाधिकारी साहेबराव आडे, कारागृह अधिक्षक चंद्रमणी इंदूरकर यांचे यासाठी सहकार्य लाभले.