इस्लामपूर : स्टंट करत तरुणाने फणा काढलेल्या विषारी नागाचा व्हिडिओ करणे तरुणाच्या अंगलट आले असून वनविभागाने त्याला कारवाईचा ‘ठोका’ दिला आहे.
याबाबत माहिती अशी, माहिती अशी, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे हा सर्पमित्र नाग आणि साप पकडत होता. फणा काढलेल्या नागाच्या समोर तोंड नेऊन त्याचे चुंबन घेण्याचे जीवघेणा स्टंट तो करत होता. त्याचे व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करत होता. वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. या तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागाबरोबर जीवघेणा स्टंट करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे.