मुंबई : जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक महागाईचा दणका बसणार आहे. जीवनावश्यक असणाऱ्या पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
१ एप्रिलपासून औषधांचे दर वाढवण्यात येणार आहेत. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून डायबिटीस, कॅन्सर, हायबीपी, पॅरासिटॉमोलसह ८०० प्रकारच्या औषधांचे दर वाढणार आहेत. ही दरवाढ १० टक्क्यांनी होण्याची शक्यता जात आहे. पेनकिलर अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह इतर आवश्यक औषधांच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत.