म्हारुळच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. रुपाली चौगले

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : म्हारुळच्या (ता. करवीर) सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. रुपाली मोहन चौगले यांची निवड करण्यात आली.

  करवीर तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या म्हारुळ गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. रोटेशन पध्दतीने सरपंचपदाचा मान शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. आमदार नरके समर्थक सौ. रूपाली मोहन चौगले यांचीर सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी करवीरचे माजी सभापती रविंद्र मडके, दत्त संस्थेचे अध्यक्ष एकनाथ चौगले, उपसरपंच सागर चौगले,  माजी सरपंच वदंना म्हाकवेकर, सदस्य सरदार पाटील,  प्रकाश कांबळे, राजाराम कुंभार, अलका पाटील, शालाबाई गुरव, रेखा कुंभार, ग्रामसेवक पी. एस. मेंगाणे, तलाठी प्रियांका भोईर आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगरुळचे मंडल अधिकारी बोधे यांनी काम पाहिले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.