नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा दणका बसण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पेट्रोल 84 तर डिझेल 85 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ते अंदाज आता खरे ठरत दिसत आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.