महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील पोषण आहारात अळ्या

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयातील पोषण आहारात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर महापालिकेच्या शाळामध्ये पोषण आहार दिला जातो. मंगळवार पेठेतील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात बुधवारी विद्यार्थिनीना पोषण आहार म्हणून खिचडी भात देण्यात आला. या खिचडी भातात अळ्या असल्याचे एका सातवीच्या विद्यार्थिनीला निदर्शनात आले. तिने हा प्रकार तातडीने मुख्याध्यापकांना सांगितला. याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. याबाबतची माहिती महापालिका अधिकारी आणि पालकांना मिळताच उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विद्या पोळ, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांच्यासह अभिजीत देवणे, सामाजिक कार्यकर्ते नियाज खान, अंजुम देसाई यांनी शाळेत येऊन पाहणी केली.

  दरम्यान, शाळेतील पोषण आहाराचा ठेका मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांनी सांगलीच्या नीलाक्षी बचत गटाला दिला होता. यामुळे कार्यकर्त्यांनी कुंभार यांना धारेवर धरले. या घटनेचा पंचनामा सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.