रेल्वे चाईल्ड लाईनच्या दिशादर्शकाचे उद्घाटन

कोल्हापूर : केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या व सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्डच्या माहिती दिशादर्शकाचे उद्घाटन कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर विजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सांगली मिशन सोसायटीचे प्रोजेक्ट डायरेक्ट फादर लिजो यांनी बालकांचे हक्क व कायदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रेल्वे चाईल्ड लाईनचे कॉर्डिनेटर अभिजीत बोरगे, रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल पाटील, लोहमार्ग पोलीस व सांगली मिशन सोसायटीचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.