जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत इचलकरंजीच्या डायनॅमिक स्पोर्ट्सला उपविजेतेपद

इचलकरंजी : गुडाळ (ता. राधानगरी) येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत इचलकरंजीच्या डायनॅमिक स्पोर्ट्सच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावलले. जिल्हा कबड्डी असोसिएशन व गुडाळेश्वर क्रीडा मंडळ,  गुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुमार व कुमारी गटाच्या अजिंक्यपद व जिल्हा निवड चाचणी स्पर्धा गुडाळ येथे घेण्यात आल्या.

 या स्पर्धेसाठी कुमार गटात 52 तर कुमारी गटात 18 संघांनी सहभाग घेतला होता. हे सर्व संघ बाद पद्धतीने झालेल्या सामन्यांमध्ये कुमारी गटात डायनॅमिक संघाने कारवे, चंदगड या संघांवर विजय मिळवीत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आव्हान होते साई स्पोर्ट्स, कोरोची संघाचे. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. जय-पराजयाचे पारडे क्षणाक्षणाला दोन्हीकडे क्रमाने झुकत होते. शेवटच्या चढाईने हा अविस्मरणीय सामना संपला,  आणि अवघ्या एका गुणाने साई स्पोर्ट्स, कोरोची विजयी ठरले. डायनॅमिक स्पोर्ट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डायनामिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय कुडचे, प्रशिक्षक प्रा. शेखर शहा, भूषण शहा, अतुल बुगड, बाळू काकडे, वासिम बागवान, चंद्रकांत बंडगर, नामदेव पवार यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.

संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे : गौरी शिरगुरे, साक्षी जाधव, प्रांजल पवार, निकिता चौगुले, साबिया नदाफ, धनश्री पाटील, पायल साबळे, प्रणिता सुतार, साक्षी नेमिष्टे, प्रियंका शेट्टी, श्रुती पोवार.