कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण अपघात; दोघे ठार

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावर माले फाट्याजवळ स्कूल बसला पाठीमागून मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. सुरज शिंदे (रा. चंदूर), शीतल पाटील (रा. हरोली) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी,  सूरज व शीतल पाटील हे मोटरसायकलवरून (क्र. एमएच-एसी ०९-११०९) दोघे कोल्हापूरच्या दिशेने चालले होते. हातकणंगले तालुक्यातील हालोंडी ते हेरलेच्या ते माले फाट्याजवळ संजय घोडावत स्कूलच्या बसला मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. घटना स्थळाचे चित्र विदारक होते. रक्ताचा सडा पडला होता. तर मोटरसायकल चक्काचूर झाली होती. तर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पोलीस आल्यावर त्यांनी गर्दी हटवली.