शहरातील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी देणार : सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकासकामासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, शहरातील एकही प्रलंबित काम मागे ठेवणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शुक्रवारपेठ पोलीस चौकी ते पंचगंगा हॉस्पिटल रस्ता (आखरी रस्ता) डांबरीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

सतेज पाटील यांच्या आमदार फडातून ५० लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या शुक्रवारपेठ पोलीस चौकी ते पंचगंगा हॉस्पिटल या आखरी रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ नामदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील महावीर गार्डन आणि हुतात्मा गार्डन या दोन बगीच्यांचे सुशोभीकरण करण्यासह स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्याचे कामही आपण लवकरच हाती घेणार आहे. शहरातील उद्यान बगीच्याची डागडुजी करून सुशोभीकरण करण्यासाठी पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली. यावेळी जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आमदार फंडातून पंधरा लाख रुपये खर्चून ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचा शुभारंभ नामदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, निशिकांत मेथे, श्रीकांत बनछोडे, अनिल पाटील, लता कदम, संभाजी बसुगडे, चंदा बेलेकर, प्रकाश गवंडी,अफजल पिरजादे, धनंजय सावंत, संभाजी जाधव, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, विनायक फाळके, प्रताप जाधव , उमा बनछोडे ,शिवानंद बनछोडे, विक्रम जरग, निशिकांत मेथे किरण मेथे, नेपोलियन सोनूले, प्रवीण लिंमकर,सनी सावंत उपस्थित होते.