गर्जनच्या जोतिर्लिंग संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम चव्हाण

 बहिरेश्वर : गर्जन (ता. करवीर) येथील जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम गोविंद चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग एकनाथ जगताप यांची बिनविरोध झाली.

संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणूक घेण्यात आली. १२ पैकी २ सदस्य अनुपस्थित राहिले. चेअरमनपदासाठी उत्तम गोविंद चव्हाण तर व्हा. चेअरमन पदासाठी पांडुरंग एकनाथ जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध घोषित केली. सभेस नवनिर्वाचित सदस्य राजाराम बाळू नाईक, मारुती यशवंत कांबळे, तातोबा बजाप्पा सावंत, सुभाष कृष्णात चव्हाण, लीला भुपाल भोसले, मंगल प्रकाश देसाई, पांडुरंग सत्याप्पा नाईक, अशोक लक्ष्मण नाईक उपस्थित होते. सचिव अनिल गवळी यांनी आभार मानले.