क्रिकेट क्षेत्राला मोठा धक्का; शेन वॉर्नचे हृदयविकाराने निधन

बॅंकॉक (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न हा थायलंड येथील कोह सामुई येथे असताना त्याचे निधन झाल्याची माहिती त्याच्या मॅनेजमेंट संस्थेने दिली.


शेन वॉर्नच्या व्यवस्थापकीय टीमने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत त्याच्या निधनाची माहिती दिली. शेन थायलंडमधील कोह समुई बेटावर असताना त्याचे निधन झाले. तिथे तो त्याच्या सहकाऱ्यांना बेशुद्धावस्थेत आढळला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्व गाजवले होते. वॉर्नकडे नेतृत्व करण्याची चांगली क्षमता होती आणि ते त्याने आयपीएलमध्येही दाखवून दिले. पहिल्याच आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाखाली वॉर्नने राजस्थान रॉयल्सला जेतेपद पटकावून दिले होते.