भारताची आजपासून श्रीलंकेविरुद्ध ‘कसोटी’

मोहाली (वृत्तसंस्था): भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला क्रिकेट सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज शुक्रवारपासून सकाळी ९.३० पासून खेळवला जाणार आहे.
भारताने श्रीलंकेविरुद्धवी टी २० मालिकाने जिंकली आणि आता कसोटी मालिकातही जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताला १-२ ने पत्करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. दरम्यान श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेतीवर मात केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ही १०० वी कसोटी आहे.

भारत व श्रीलंका यांच्यात आतापर्यंत ४४ कसोटी सामने झालेत. यात भारताची कामगिरी सरस राहिली आहे. भारताने २० विजय मिळवला आहे तर श्रीलंकेला सातवेळा विजय नोंदवता आला आहे.

आर. अश्विन व रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असून पहिल्या सामन्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.
अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनवर फलंदाजी व गोलंदाजीसह चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. तर संघातील दुसरा फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाचा समावेश होणार आहे. श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहाता त्याचे अंतिम अकरामधील स्थान निश्चित आहे. श्रेयसने श्रीलं के विरूद्धच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावले होते. हनुमा विहारीला कसोटी क्रिकेटमधील आपले स्थान नियमित करण्याची ही चांगली संधी आहे.